Breaking News
खेड : लवेलच्या जंगलाला पुन्हा वणवा! निसर्ग माहिती केंद्राच्या दारातच वणव्याचा भडका; दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव धोक्यात, वणवे रोखणार कोण? दापोली : काळकाई कोंड येथे रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद संगमेश्वर : तेलीवाडीत दुचाकीस्वार तरुणाला आधी महिलांनी मारलं नंतर तरुणांनी , पाच जणांकडून मारहाण, उजव्या हाताला फ्रॅक्चर, जुन्या तक्रारीचा आणि वादाचा राग मनात धरून हल्ला रत्नागिरी : हातखंबा येथे गोवा बनावटीच्या मद्याचा मोठा साठा जप्त, 1.75 कोटींचा मुद्देमाल हस्तगत, ट्रकचालक अटकेत दापोली : काजूच्या बागेला आग, 720 झाडांसह पाइपलाइन जळून खाक, आठ एकरांतील बागेचे नुकसान, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल, सुमारे 15 लाख रुपयांची वित्तहानी

दापोलीत : विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील जालगाव
येथे माहेरून पैशांची मागणी करत सतत छळ केल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरच्या चौघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंकीदेवी धर्मेंद्रकुमार धामिन (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पिंकीदेवीचा भाऊ, विरेंद्रकुमार जनार्दन पंडा (वय ३४, रा. ग्राम बलिया, झारखंड) यांनी दापोली पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पिंकीदेवीचे सासरचे लोक तिला वारंवार शिवीगाळ करत होते, धमकी देत होते आणि पैशांची मागणी करत होते. या त्रासाला कंटाळून तिने आपले जीवन संपवले.


ही घटना ९ नोव्हेंबर २०२३ ते १३ जून २०२५ या कालावधीत झारखंड येथील नोडीहा गाव आणि दापोलीतील जालगाव येथे घडली. दापोली पोलिसांनी धर्मेंद्रकुमार धामिन (पती), राजेशकुमार धामिन (दीर), एक महिला (सासू) आणि रामदेव धामिन (सासरे) या

चौघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१(१), ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी धर्मेंद्रकुमार आणि राजेशकुमार धामिन हे सध्या दापोलीतील जालगाव येथे राहत आहेत.


या गुन्ह्याची नोंद १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:२८ वाजता करण्यात आली आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *