दापोली : बस स्थानकात महिलेच्या पायावरून गेला एसटीचा चाक, महिला जखमी

banner 468x60

दापोली बस स्थानकात वृद्ध महिलेच्या पायावरून एसटीचा चाक गेल्याने महिला जखमी झाली आहे.

दापोली एसटी स्टँडमध्ये आज दुपारी गाडी क्रमांक MH.14 BT 2300 गाडीचे चालक गाडी घेऊन बस स्टॅन्डवरून एस टी बस रिव्हर्स घेत असताना वृद्ध महिला गाडी जवळ येऊन कोणती गाडी लागली आहे.

हे विचारण्याकरिता गाडीच्या जवळ आली असता गाडीच्या पुढील भागाला धक्का लागून खेर्डी गावातील महिलेच्या पुढील पायावरून एसटीचा चाक गेल्याने महिला गंभीर जखमी झाली,

तिच्या पायाला दुखापत झाली असून दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत. पंचनामा करण्याचे काम चालू असून गाडी चालक यांना ताब्यात घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *