परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपायोजनांच्या दृष्टीने लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, गॅबियन वॉल घसरण्याचा प्रकार समोर आला आहे.
यावरून गॅबियन उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे लोखंडी जाळी बसवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
तसेच दुसरीकडे गेल्या पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे काम देखील वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोर धरल्याने सदरील कामे थांबली होती. आता पुन्हा या कामाने वेग घेतला असला तरी, गॅबियन वॉल घसरत असल्याचे समोर आले आहे.
पुन्हा एकदा परशुराम घाटातील निकृष्ट कामाचा नमुना समोर आला असल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*