गुहागर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत, कोतळूक येथील हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला १००% मुद्देमाल हस्तगत केला असून, एका आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.
2 जून रोजी मध्यरात्री गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोतळूक येथील श्री. हनुमान मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा अज्ञात इसमाने कडी-कोयंडा उचकटून उघडला. गाभाऱ्यात प्रवेश करून तेथे ठेवलेली लाकडी दानपेटी चोरून नेल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाली.
या घटनेप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक. जयश्री गायकवाड,
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण. राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी तात्काळ एक पथक नेमले. गोपनीय माहिती आणि मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेण्यात आला. घटना घडल्यापासून अवघ्या ४ तासांतच सौरभ संतोष कदम, रा. मळण रोड, श्रृंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी या आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या अटकेबाबत पुढील कार्यवाही सुरू असून, त्याने चोरून नेलेला १००% मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या ४ तासांत हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारच्या मंदिर चोऱ्या आणि घरफोडीचे गुन्हे केले आहेत का, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक. जयश्री गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण. राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक. सचिन सावंत, पोलीस उपनिरीक्षक. सुजीत सोनावणे, म.पो.ना/२०७४ स्वामिनी नाटेकर, पोकॉ/१९६ वैभव चौगले, पोकॉ/२७१ प्रतिक रहाटे, पोकॉ/१२७७ प्रथमेश कदम, पोकॉ/७७९ निखील पाटील आणि म.पोकॉ/१४५३ सिमा मोरे यांनी पार पाडली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















