दाभोळ : माही पराग शहा हीचं विक्रम, 10 वी सीबीएसई CBSE बोर्ड परीक्षेत मिळविले 99.2% टक्के गुण, शाळेत प्रथम

banner 468x60

सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. १५ फेब्रुवारी ते ०४ एप्रिल २०२५ दरम्यान परीक्षा झाली होती. अखेर १३ मे २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यंदाही राज्यात मुलींची बाजी मारली आहे. दापोली तालुक्यातील दाभोळमधील माही पराग शहा हिने विक्रम करत १०वी सीबीएसई CBSE बोर्ड परीक्षेत 99.2% टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम आली आहे.

माहीने 99.2% टक्के गुण मिळवत उत्तीर्णतेचा विक्रम केला आहे. माही गुहागरमधील बाल भरती पब्लिक स्कुल RGPPL येथे शिकत आहे. माही शाळेत आधीपासूनच हुशार असल्याने १०वी सीबीएसई CBSE बोर्ड परीक्षेत देखील तिने एक नवा विक्रम केलाय.

माहीच्या या यशाने शाळेचे , संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. दाभोळमधूम देखील माहीचं विशेष कौतुक केलं जात आहे.

माहीच्या यशामुळे सर्वच स्तरातून तिचं कौतुक सध्या सुरु आहे. कोकण कट्टा न्यूज मार्फत माहीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *