दापोली : दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील खेर्डी देऊळवाडी येथील 65 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत घरातील पंख्याला साडीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना 31 मार्च 2025 रोजी रात्री 8:28 वाजता घडली असून, मृत व्यक्तीचे नाव शांताराम रामचंद्र जाडे असे आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात रात्री 9:49 वाजता नोंद करण्यात आली आहे.

मयत शांताराम रामचंद्र जाडे (वय 65 वर्षे, राहणार: खेर्डी देऊळवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी 31 मार्च रोजी दारूच्या नशेत आपल्या घरातील हॉलमध्ये छताच्या पंख्याला नायलॉन साडीची दोरी बांधली.

त्यानंतर त्या दोरीने गळ्याला फास लावून त्यांनी आत्महत्या केली. ही घटना लक्षात आल्यानंतर खबर देणाऱ्या व्यक्तीने गावातील ग्रामस्थांच्या मदतीने शांताराम यांना खाली उतरवले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले.

मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

पोलिसांनी बी.एन.एस.एस. 194 अंतर्गत आमृ. क्रमांक 25/2025 म्हणून या प्रकरणाची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले असून, शांताराम जाडे यांनी दारूच्या नशेत हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे..

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *