चिपळूणमध्ये सायकलचा तोल जाऊन अपघात, 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील गांगराई येथे सायकल चालविताना उतारावर तोल जाऊन झालेल्या अपघातात मुंबईतील ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस माहितीनुसार, अनिल ग्लेन डिसोजा (वय ५३, रा. भायखळा, मुंबई) हे २६ जून २०२६ रोजी सायंकाळी गांगराई (ता. चिपळूण) येथे फिरत असताना तेथील एका व्यक्तीची सायकल चालवत होते. उतारावरून जात असताना सायकलचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर त्यांना तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची आकस्मिक मृत्यू क्रमांक ३८/२०२६ अशी नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *