गुहागर तालुक्यातील अडूर भाटलेवाडी येथील ४२ वर्षीय संतोष सहदेव देवळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देवळे यांना १० ऑगस्ट २०२६ रोजी मणक्याची शीर दबल्याने त्रास जाणवू लागला होता. त्यांना प्रथम गुहागर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. त्यांच्यावर पुढील औषधोपचार सुरू होते.
त्यानंतर प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने १२ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यान त्यांना अधिक उपचारासाठी वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान अचानक त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.५४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजता आकस्मिक मृत्यू क्रमांक ३२/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













