चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाविरोधात तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या व्यक्तीविरोधात चिपळूण पोलिसांनी कारवाई केली आहे.
पहिल्या प्रकरणात, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका येथे पोलिसांना निलेश दिलीप सुतार (वय ३५, रा. धामणंद, ता. खेड) हा मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत वाहन चालविताना आढळून आला. तो आयशर वाहन क्रमांक एमएच ४६ सीएल ४३७७ चालवत होता. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०६/२०२६ नोंद करण्यात आला असून मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार संतोष रघुनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली.
दुसऱ्या प्रकरणात, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.२० वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका येथील मुंबई-गोवा महामार्गावर कोकणदीप सुपर मार्केटसमोर एका वाहनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहन सार्वजनिक रस्त्यावर अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की, ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. वाहनचालक तेथे नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी बलवंत हरिश्चंद्र कुमार (वय ३८, रा. उमिला पोस्ट बद्धाकाला, पीएस खलीलाबाद, जि. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा क्रमांक ३०७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम २८५ अन्वये कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निखिल युवराज जगदाळे यांनी फिर्याद दिली.
दोन्ही प्रकरणांत चिपळूण पोलीस ठाण्यात संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













