देवरुख : कोसुंब-ताम्हाने मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, आंबवलीतील तरुणाचा जागीच मृत्यू, प्रतीक सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

कोसुंब-ताम्हाने मार्गावर बुधवारी दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास चिरे वाहून नेणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत आंबवली येथील प्रतीक प्रमोद सावंत (वय ३२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, चिरे भरून जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात प्रतीक सावंत गंभीर जखमी झाले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.

कोसुंब-ताम्हाने मार्गावर चिरे वाहून नेणाऱ्या ट्रकची नियमित वाहतूक सुरू असते. या ट्रकचा वेग तसेच वाहनांचा फिटनेस, परवाने आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी होते का, याबाबत परिसरातील नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कोणाचाही धाक नसल्याने हे ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असून, प्रशासनाने तातडीने या वाहनांची तपासणी करून वेगावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या घटनेमुळे कोसुंब-ताम्हाने मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा आणि वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *