Breaking News
चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ लांजा : हर्चे शाखा डाकघरात 8.20 लाखांचा अपहार, तत्कालीन शाखा डाकपालाविरोधात गुन्हा

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात आढळला 13 वर्षीय मुलाचा मृतदेह

banner 468x60

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात आढळला 13 वर्षीय मुलाचा मृतदेह

खेर्डी शिवाजी नगर येथील वेदांत राजेंद्र खांबे या तेरा वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठी नदीपात्रात शंकरवाडी जवळ आढळून आला.

banner 728x90


विनायक रामचंद्र खांबे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात खबर दिल्यानुसार त्यांचा पुतण्या वेदांत राजेंद्र खांबे (१३, रा. खेर्डी शिवाजी नगर, चिपळूण) हा वाशिष्ठी नदीपात्रात पाय घसरुन पडल्याने वाहून गेला होता.


त्याचा मृतदेह शंकरवाडी जवळ वाशिष्ठी नदी पात्रात आढळला.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *