Breaking News
संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी रत्नागिरी-कुवारबाव मार्गावर ग्रेडरच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

गुहागर : पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना

banner 468x60

मित्रांसाेबत पाेहून झाल्यानंतर पुन्हा तलावात पाेहायला गेलेल्या काेंडकारुळ (ता. गुहागर) येथील २४ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


प्रज्याेत मेहता (रा. जागकरवाडी, काेंडकारूळ, गुहागर) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी (५ जुलै) साखरी आगर येथे घडली.


प्रज्योत हा आपल्या मित्रांसमवेत बुधवारी दुपारी साखरी आगर येथील तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता.
त्याच्यासोबत कोंडकारूळ येथील दोघेजण होते. तर यावेळी तलावात वेळणेश्वर व साखरी आगर येथील काही तरुणही पोहत होते. दुपारपासून सायंकाळपर्यंत हे सर्वजण तलावात पाेहत हाेते.


सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हे सर्वजण घरी निघाले.तलावापासून काही अंतरावर साखरीआगर फाटा येथे गेल्यानंतर प्रज्योतने आपल्यासमवेत दुचाकीवर असलेल्या मित्रांना मला पुन्हा पोहायचे आहे,


असे सांगत दुचाकी तलावाकडे नेली. मित्रांनी आपण आता घरी जाऊया, असे त्याला सांगितले. मात्र, मित्रांचे न ऐकता प्रज्योतने पाण्यामध्ये उडी मारली. बराचवेळ झाला तरी तो पुन्हा वर आला नाही.


आपला मित्र पाण्याच्या बाहेर येत नाही, असे लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी पाण्यात उडी मारली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले. तातडीने त्यांनी पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला.


मात्र, तो कोणतीच हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्या मित्रांनी तात्काळ त्याला हेदवी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लुकमान तडवी, किशोर साळवी यांनी पंचनामा केला. गुहागर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *