दापोली : माटवण येथून महिला बेपत्ता

banner 468x60

दापोली तालुक्यातील माटवण भाननगर येथून स्वाती जनार्दन पवार वय ४३ ही महिला बेपत्ता झाली आहे. आपल्या रहात्या घरून २६ जून २०२४ रोजी सकाळी ०९ वाजता कामाला जाते असं सांगून ही महिला घरातून निघून गेली.

त्यानंतर ही महिला आजपर्यंत घरी आली नाहीय. महिलेच्या नातेवाईकांकडेही शोध घेतला असता सदर महिला न भेटल्याने हरवल्याची तक्रार सुधीर जनार्दन पवार यांनी दापोली पोलिसात दाखल केली आहे.

कोणाला सदर महिला आढळून आल्यास दापोली पोलीस स्थानकात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *