गुहागर तालुक्यातील मळण येथे घराच्या बांधकामावेळी झालेल्या भीषण अपघातात एका ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नरेश पाष्टे (वय ३४, रा. खामशेत पाष्टेवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून गुरुवार, २८ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मळण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मळण येथील एका घराचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी नरेश पाष्टे हे लोखंडी अँगलच्या खांबांचे मोजमाप घेण्याचे काम करत होते. काम सुरू असताना ते पडवीच्या भिंतीवर उभे राहून माप घेत होते. मात्र, अचानक त्यांचा तोल गेल्याने ते घराशेजारी असलेल्या कोरड्या वहाळामध्ये कोसळले. याचवेळी भिंतीवरील जड चिरेही त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तत्काळ धाव घेत नरेश यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पाष्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी गुहागर पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक भोपळे पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













