Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

मंडणगडमध्ये वाहतुकीस अडथळा, दोन चारचाकी चालकांवर गुन्हे दाखल

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना २४ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयासमोरील आठवडा बाजार परिसरात घडली. याप्रकरणी सलीम कासीम सावंत (वय ६१, रा. कोणार एलिगेन्स, प्लॉट क्र. बी-२५, वडगाव शेरी, पुणे) यांनी त्यांच्या ताब्यातील MH 12 DM 3345 क्रमांकाची चारचाकी मंडणगड-मुंबई मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करून वाहने व पादचाऱ्यांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले.

banner 728x90

याप्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल विठोबा कोळथरकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा क्रमांक ७२/२०२६ दाखल करण्यात आला.

त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी आणखी एका वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. वैभव संतोष पोस्टुरे (वय ३२, रा. तुळशी, ता. मंडणगड) यांनी MH 02 DN 4475 क्रमांकाची चारचाकी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी केल्याचे आढळून आले. याप्रकरणीही पोलीस कर्मचारी विशाल विठोबा कोळथरकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ७३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *