Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : जांभूळ फाटा ते मिरजोळे ददरम्यान दोन कारचा अपघात

banner 468x60

रत्नागिरी शहरानजीकच्या जांभूळ फाटा धार व मिरजोळे धार येथील रस्त्यावर एका मोटारीने दुसऱ्या मोटारीला धडक दिली. या प्रकरणी संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनय रविंद्र साळवी (वय ५०, रा. टेंभ्ये, रत्नागिरी) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ७) दुपारी आडीचच्या सुमारास जांभूळ फाटा धार ते मिरजोळे धार रस्त्यावर घडली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार शुभम शिवाजी सनगरे हे मोटार (क्र.एमएच-०८ एएक्स ०१५१) ही रत्नागिरी ते मजगाव असे जात असताना जांभूळ फाटा धार व मिरजोळे धार या ठिकाणी आले असता रत्नागिरीच्या दिशेकडे येणारा मोटार (क्र. एमएछ-४३ सीएम ५४६८) वरिल संशयित चालक अभिनय साळवी यांनी शुभम सनगरे यांच्या मोटारीला धडक दिली.

या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *