दापोली तालुक्यातील गावतळे गावात ईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी (दि.१६) सकाळी दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. दापोलीपोलिसांनी थेट गावतळे गाठून ईव्हीएम मशीन सापडलेल्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, पाहणीअंती त्या ईव्हीएम मशीन नसूनशाळेतील मुलांची खेळणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. देशातील आणि राज्यातीलप्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दापोलीतईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी पसरली. याबाबत दापोली पोलीस यांच्याशी संपर्क साधला असता गावतळेत कोणतीहीईव्हीएम मशीन आढळून आलेली नाही. मुलांची शाळेची खेळणी आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीसयंत्रणा सर्व ठिकाणी चोख लक्ष ठेऊन आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या…
ratnagiri
दाभोळ : विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव आढळले, सावधान हा पाव नाही हा गुटखा पाव
दाभोळमध्ये गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडले आहेत. दाभोळमधील विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा…
खेड : आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी…
दाभोळ : गळफास लावून वृद्धाची आत्महत्या
दापोली तालुक्यातील दाभोळमधील दालेश्वर पाखाडी येथे चंद्रकांत शंकर पानकर या 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची…
होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी 8 विशेष गाड्या
होळीसाठी मुंबई, पुण्यातून गावी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रेल्वेने…
गुहागर :श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा
ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथील श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात महाशिवरात्री…
चिपळूण : कामथे घाटात दुचाकीचा भीषण अपघात; तरुण जागीच ठार
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमधील कामथे घाटात क्रेनचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी…
खेड : दोन शाळकरी मुलींचे अपहरण
खेड शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार शुक्रवारी रात्री…
दापोली : पालगड ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार, पाच अंकी पगार घेत असलेल्या अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष, सोंडेघर नळपाणी योजनेच्या कर्मचाऱ्यांना 9 महिने पगार नाही
दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. पालगडला सोंडेघर धरणातील पाणी पुरवठा करणाऱ्या…
चिपळूण : बेकायदा वाळू प्रकरणी दोन ठिकाणी कारवाई
चिपळूण शहरात शासकीय दराने वाळू उत्खनन आणि वितरण सुरू असताना दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली…
No More Posts Available.
No more pages to load.
