Breaking News
रत्नागिरी : ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 लाख 36 हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त रत्नागिरी : ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 लाख 36 हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त रत्नागिरी : ‘रत्नागिरीचा राजा’च्या मंडपातून चांदीचे ताम्हण लंपास; भरदिवसा 40 हजारांची चोरी, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त अपरांत हॉस्पिटलकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नवसाचा राजा गणपती मंडळात नागरिकांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन रत्नागिरीच्या समुद्रात अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाची धडक कारवाई, तीन नौकांवर कारवाई

रत्नागिरीच्या समुद्रात अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाची धडक कारवाई, तीन नौकांवर कारवाई

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र आणि किनारी भागात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या मासेमारीविरोधात मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमित गस्तीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन स्क्विड जिगिंग नौका आणि एलईडी दिव्यांचा वापर करणाऱ्या एका नौकेचा समावेश आहे.

मत्स्य विभागाकडून रत्नागिरीच्या किनारपट्टीवर अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी नियमित गस्त आणि तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान २२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या गस्तीमध्ये दोन स्क्विड जिगिंग नौका नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्या.

यामध्ये ‘सानिया हफ्सा’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-3851) या नौकेचा समावेश असून, तिचे मालक सिकंदर जैनुद्दीन फणसोपकर आहेत. तसेच ‘एच. सिमाक’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-601) या नौकेवरही कारवाई करण्यात आली. या नौकेच्या मालकाचे नाव सुलताना अख्तर होडेकर असे आहे.

करला जेट्टीवर एलईडी दिव्यांची नौका आढळली

दरम्यान, २३ सप्टेंबर २०२६ रोजी करला जेट्टी येथे तपासणी करण्यात आली. यावेळी ‘गुरुप्रसाद’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-3766) ही नौका एलईडी दिव्यांनी सुसज्ज असल्याचे मत्स्य विभागाच्या निदर्शनास आले.

या नौकेच्या मालकाचे नाव सुगंधा सुरेश ताकले असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित नौकेवर मत्स्य विभागाकडून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

समुद्रासह जेट्टी परिसरात गस्त वाढणार

जिल्ह्यातील समुद्र आणि किनारी भागात नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून पुढील काळातही समुद्र, जेट्टी आणि बंदर परिसरात गस्त व तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

मासेमारी व्यवसायातील नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित नौका मालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार आणि नौका मालकांनी लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच मासेमारी करावी, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *