खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देत दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या येथील एम. आय. हजवाणी इंग्लिश मिडीयम स्कूलचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची दखल घेत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेचे चेअरमन बशीरभाई हजवाणी तसेच मुख्याध्यापिका सलवा तिसेकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रशालेने केवळ शैक्षणिक गुणवत्तेलाच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासालाही प्राधान्य दिल्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शिक्षकांचे मार्गदर्शन, व्यवस्थापनाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये प्रशालेने सातत्याने उल्लेखनीय निकाल नोंदवले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, अविनाश दळवी, उत्तम कांबळे, संदीप मोरे, विनोद मोरे तसेच गोविंद राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशीच शैक्षणिक प्रगती कायम राहावी, अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण संस्थांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













