मंडणगड तहसीलदार यांच्या आस्थापनेवरील चिंचघर, वेसवी, लाटवण, पंदेरी, सावित्री आणि वेळास या सजांमध्ये रिक्त असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या सहा जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तहसीलदार, मंडणगड कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज साद करावयाचा आहे.
या पदासाठी उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असणे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असावे. तसेच उमेदवार मंडणगड तालुक्यातील रहिवासी असणे बंधनकारक असून, त्यासाठी आवश्यक रहिवासाचा पुरावा साद करावा लागणार आहे.
१५ नोव्हेंबरला लेखी परीक्षा
महसूल सेवक पदासाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून ५० प्रश्नांसाठी एकूण १०० गुण असतील. चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही. सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित, मराठी भाषा तसेच रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती या विषयांचा परीक्षेत समावेश असेल.
अर्जासाठी ५० रुपये शुल्क
अर्ज सादर करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. याशिवाय परीक्षा शुल्क मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३०० रुपये, तर इतर उमेदवारांसाठी ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
२८ नोव्हेंबरला नियुक्तीपत्र
भरती प्रक्रियेनुसार १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान अर्जांची छाननी करण्यात येईल. पात्र उमेदवारांसाठी ४ ते १० नोव्हेंबरदरम्यान प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबरला लेखी परीक्षा, १६ नोव्हेंबरला उत्तरसूची व निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर १७ ते २७ नोव्हेंबरदरम्यान कागदपत्रांची पडताळणी होईल. पात्र उमेदवारांना २८ नोव्हेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
पात्र उमेदवारांनी जाहिरातीतील शैक्षणिक पात्रता, रहिवास, आवश्यक कागदपत्रे, आरक्षण व शुल्कासंबंधी अटींची माहिती घेऊन विहित मुदतीत अर्ज साद करावेत, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













