Breaking News
लांज्यात 16 वर्षीय मुलगा बेपत्ता, पोलिसांत नोंद रत्नागिरी : गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 1.92 लाखांचा मुद्देमाल जप्त, 40 लिटर तयार हातभट्टी दारू जप्त राजापूर : राजापुरात रस्त्यावर मासेविक्री, सहा महिलांवर नगरपरिषदेची कारवाई, मच्छीची खवले व सांडपाणी रस्त्यावर टाकून दुर्गंधी पसरवल्याचा आरोप, सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल चिपळूण : चिपळूण बाजारपेठेत फटाके विक्रीला बंदी, नगरपरिषदेचा मोठा निर्णय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करणार; सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाची खबरदारी चिपळूण : स्वातंत्र्याला दशके उलटली, तरी तिवरे–गंगेचीवाडी नेटवर्कपासून वंचित नेटवर्क टॉवर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी, मोबाईल नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त

रत्नागिरी : गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 1.92 लाखांचा मुद्देमाल जप्त, 40 लिटर तयार हातभट्टी दारू जप्त

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील मौजे शिळ-कदमवाडी येथील नदीकाठच्या झाडीझुडपात बेकायदा सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर रत्नागिरी शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ९२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिळ-कदमवाडी परिसरातील नदीकाठच्या निर्जन आणि जंगलमय भागात गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान करबुडे येथील सुनील सुरेश आग्रे (३८, रा. आग्रेवाडी, करबुडे, ता. जि. रत्नागिरी) हा विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हातभट्टी दारू तयार करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता, विविध २०० लिटर क्षमतेच्या बॅरल्समध्ये साठवलेले सुमारे २ हजार ९०० लिटरहून अधिक गूळ-नवसागरमिश्रित कुजके रसायन, ४० लिटर तयार हातभट्टी दारू तसेच दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारी ॲल्युमिनियमची डेग, लाकडी चाटू, पाईप, प्लॅस्टिक कॅन्स आदी साहित्य आढळून आले.

हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, त्याची एकूण किंमत १ लाख ९२ हजार २०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अमिता संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील आग्रे याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *