Breaking News
रत्नागिरी : गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 1.92 लाखांचा मुद्देमाल जप्त, 40 लिटर तयार हातभट्टी दारू जप्त राजापूर : राजापुरात रस्त्यावर मासेविक्री, सहा महिलांवर नगरपरिषदेची कारवाई, मच्छीची खवले व सांडपाणी रस्त्यावर टाकून दुर्गंधी पसरवल्याचा आरोप, सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल चिपळूण : चिपळूण बाजारपेठेत फटाके विक्रीला बंदी, नगरपरिषदेचा मोठा निर्णय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करणार; सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाची खबरदारी चिपळूण : स्वातंत्र्याला दशके उलटली, तरी तिवरे–गंगेचीवाडी नेटवर्कपासून वंचित नेटवर्क टॉवर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी, मोबाईल नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त मंडणगड : साईराज सावंत यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मंडणगड तालुकाध्यक्षपदी नियुक्ती, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

चिपळूण : चिपळूण बाजारपेठेत फटाके विक्रीला बंदी, नगरपरिषदेचा मोठा निर्णय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करणार; सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाची खबरदारी

banner 468x60

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील बाजारपेठेची सुरक्षितता लक्षात घेता नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बाजारपेठ परिसरात फटाक्यांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली असून, फटाके विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

दिवाळीच्या काळात चिपळूणच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत बाजारपेठेत फटाक्यांचे स्टॉल उभारल्यास आग लागण्यासह अन्य दुर्घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वी बाजारपेठ परिसरात आगीच्या घटना घडल्याने भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

फटाके विक्रेत्यांना व्यवसायासाठी शहरातील स्वतंत्र आणि सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांकडून संभाव्य जागेची पाहणी केली जाणार आहे. जागा निश्चित झाल्यानंतर सर्व फटाके विक्रेत्यांना तेथे स्टॉल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या निर्णयामुळे फटाके विक्रेत्यांना एकाच ठिकाणी व्यवसाय करता येईल, तर नागरिकांनाही सुरक्षित वातावरणात फटाक्यांची खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर बाजारपेठेतील गर्दी आणि संभाव्य आगीचा धोका कमी करण्यास मदत होणार आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेत कोणत्याही ठिकाणी फटाक्यांची विक्री होऊ नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती बांधकाम समितीचे सभापती कपिल शिर्के यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *