Breaking News
रत्नागिरी : पालीत भरधाव मोटारीची दुचाकीला मागून धडक, पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी देवगड : समुद्रात अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाचा दणका, एक नौका जप्त दापोली : अवर्षणामुळे खरीप पिके वाया; दापोलीत भारतीय किसान संघ आक्रमक, हेक्टरी 50 हजारांची मदत, रब्बीसाठी मोफत बियाणे-खतांची मागणी दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त

रत्नागिरी : भगवती बंदर येथे बोट बुडाली बोटीतील सहा जण बुडाले, 4 जणांना वाचवले तर 2 जण अद्याप बेपत्ता

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील मासेमारी होडी बंदरात परतताना भगवती बंदर येथे समुद्रात बुडाली. मिरकरवाडा येथे ब्रेक वॉटरच्या आतमध्ये बोटीचा अपघात झाला. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अमीना आयशा असं बोटीचं नाव आहे.

या बोटीवर आठ खलाशी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. यापैकी सहा खलाशांना स्थानिक मासेमारी बोटीने वाचवले. मात्र दोन खलाशी अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.


नौका बुडाल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खलाशांनी एक तास पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. अखेर एका स्थानिक नौकेवरील खलाशांनी बुडणाऱ्या सहा खलाशांना बोटीवर घेतले. मात्र अद्याप दोघांचा शोध लागलेला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *