Breaking News
दापोलीकरांसाठी खुशखबर! ताम्हिणी मार्गे पुण्याला जाण्यासाठी बससेवा सुरूदापोली आगारातून चार फेऱ्या; विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा कुवेतमधील भारतीय दूतावासात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात, भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग; तिरंग्याला मानवंदना देत देशप्रेमाचा जागर गुहागर : उपचार सुरू असताना 42 वर्षीय व्यक्तीचा डेरवण रुग्णालयात मृत्यू खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे

रत्नागिरी : आरे किनाऱ्यावर पर्यटकांना मारहाण, 48 तासांत आरोपी जेरबंद

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना मारहाण झाल्याच्या घटनेने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केलेल्या वेगवान आणि अचूक कारवाईमुळे अवघ्या ४८ तासांत आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.

banner 728x90

२ मे रोजी मुंबईतील दहिसर परिसरातून आलेले काही पर्यटक आरे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी परत जात असताना त्यांचा काही स्थानिक तरुणांशी किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संबंधित तरुणांनी पर्यटकांना मारहाण करत दमदाटी केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

घटनेनंतर पर्यटकांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पर्यटनस्थळी घडलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

तांत्रिक तपास, हालचालींचे विश्लेषण तसेच स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपी पनवेल परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत चारही आरोपींना ताब्यात घेतले.

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत आरोपींना अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. पर्यटनस्थळी अशा घटना जिल्ह्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचवू शकतात, याची जाणीव ठेवून पोलिसांनी दाखवलेली तत्परता विशेष महत्त्वाची ठरली आहे.

या कारवाईमुळे “पर्यटकांची सुरक्षितता सर्वोच्च” असल्याचा स्पष्ट संदेश गेला असून, आरोपींविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *