राजापूर : महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

banner 468x60

शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने तालुक्यातील पडवे गावातील हर्षदा हरेश बाईत (वय ३५, रा. तांबे पाखाडी, पडवे) यांचा मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार २० जुलै रोजी ही दुर्घटना घडली. हर्षदा या त्यांच्या जाऊ योगिता संतोष बाईत यांच्यासोबत शेतात बेनणी करत असताना दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हाताच्या बोटाला फुरसे जातीच्या सापाने दंश केला.

घटनेनंतर योगिता आणि गावकऱ्यांनी तातडीने त्यांना राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच हर्षदा बेशुद्ध पडल्या आणि तब्येत खालावत गेल्याने त्यांना पुढील उपचारासाठी १०८ ॲम्बुलन्सद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ३ वाजून ५१ मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नाटे पोलीस स्थानकात २७ जुलै रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *