राजापूर तालुक्यात मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठक आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात पार पडली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा विचार करून योग्य वेळी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सामंत यांनी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश देत नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आदेश दिले.
बैठकीत पावसाळ्यातील रस्त्यांची दुरुस्ती, नालेसफाई, पूरप्रवण भागातील उपाययोजना, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, आरोग्य विभागाची तयारी तसेच आपत्कालीन सेवा तत्पर ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरवर्षी पाणी साचणाऱ्या व नुकसान होणाऱ्या भागांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
आमदार किरण सामंत म्हणाले, “मान्सून काळात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम केल्यास आपत्ती टाळता येऊ शकते.”
बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तयारीचा आढावा सादर केला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगामी पावसाळा लक्षात घेता प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश सूद, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, नायब तहसीलदार सरफरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














