Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूणमध्ये मटका जुगारावर एलसीबीची कारवाई, एकावर गुन्हा, रोख रक्कम जप्त

banner 468x60

चिपळूण शहरातील चिंचनाका-भोगाळे परिसरात सुरू असलेल्या अवैध मुंबई मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास भोगाळे येथील कलावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका झाडाखाली आरोपी अवैधरित्या कोणताही परवाना नसताना मुंबई मटका जुगार चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला.

या कारवाईत केशव धोंडू टेरवकर (वय ६५, रा. कंभारवाडी, चिपळूण) याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार बाळ रमेश पालकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून १ हजार ३२५ रुपये रोख रक्कम तसेच एक वापरलेले बॉलपेन असा एकूण १ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *