मंडणगड तालुक्यातील पालवणी-ब्राह्मणवाडी येथील आंबा-पोफळीच्या बागेत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका इसमाकडून मंडणगड पोलिसांनी दोन जुन्या सोलर प्लेट, वायर आणि कनेक्टर असा सुमारे २ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी रमाकांत द्वारिका राजभर (वय ४५, मूळ रा. डडवराजा, डडवा भैय्या, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. पालवणी, ब्राह्मणवाडी, ता. मंडणगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजता मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विशाल विठोबा कोळथरकर हे पालवणी-ब्राह्मणवाडी परिसरातील बागेत गस्तीवर होते. यावेळी रमाकांत राजभर हा संशयास्पद स्थितीत आढळून आला.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे दोन जुन्या सोलर प्लेट, वायर आणि कनेक्टर आढळून आले. या वस्तू कुठून आणि कोणाकडून आणल्या, याबाबत पोलिसांनी विचारणा केली. मात्र, त्याला याबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही.
यानंतर पोलिसांनी संबंधित साहित्य ताब्यात घेतले. या प्रकरणी १३ सप्टेंबर रोजी रात्री ८.३१ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलर प्लेट चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात गस्त आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. जप्त केलेल्या सोलर प्लेट नेमक्या कुठून आणल्या गेल्या आणि त्यांचा कोणत्याही चोरीच्या घटनेशी संबंध आहे का, याचा तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













