दापोलीतील विद्यार्थिनीला नोकरीचे आमिष ‘वर्क इंडिया’च्या नावाखाली तब्बल 10 लाखांची ऑनलाइन फसवणूक

banner 468x60

दापोली : ऑनलाइन नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत दापोलीतील २२ वर्षीय विद्यार्थिनीची तब्बल १० लाख ३०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोकणातील बातम्या पाहण्यासाठी whatsap group Link

banner 728x90

https://chat.whatsapp.com/H6Athrmg5om8ScNZnyXKxc?mode=gi_t

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेक मुबीन ऐनरकर (वय २२, रा. आसूद, अलमदिना मोहल्ला, ता. दापोली) या विद्यार्थिनीने ४ जून २०२६ रोजी ‘वर्क इंडिया’ (WorkIndia) या संकेतस्थळावर अकाउंटंट पदासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तिच्या व्हॉट्सअॅपवर एका करारपत्राची (Agreement) प्रत पाठविण्यात आली.

मात्र, संबंधित काम पसंत न पडल्याने महेक यांनी तो करार रद्द करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा गैरफायदा घेत अज्ञात आरोपींनी करार रद्द करण्याच्या नावाखाली विविध कारणे सांगत वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले.

६ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३६ वाजेपर्यंत, आरोपींनी फिर्यादीकडून गुगल पे, फोन पे आणि इतर ऑनलाइन व्यवहारांद्वारे विविध बँक खात्यांमध्ये आणि ई-मेल आयडींच्या माध्यमातून एकूण १० लाख ३०० रुपये जमा करून घेतले.

आरोपींनी vsunilsharmaadvsunulsharma4@gmail.com, homeunionministryhomeunionmini@gmail.com, delhisessioncourtd@gmail.com यांसारख्या विविध ई-मेल आयडींचा वापर करून विश्वास संपादन केला. मात्र, एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतरही करार रद्द करण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेक यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८, ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(डी) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नोकरीच्या आमिषाने ऑनलाइन करार, नोंदणी शुल्क किंवा करार रद्द करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, कोणतीही रक्कम भरण्यापूर्वी संबंधित कंपनीची खातरजमा करावी आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने सायबर हेल्पलाईन १९३० किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *