चिपळूण रेल्वे स्थानकासमोरील साई मंदिराजवळ पोलिसांनी कारवाई करत ५३० ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ जप्त केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२३/२०२६ दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ मधील कलम ८(क) व २०(ब)(२)(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस हवालदार संदीप सदाशिव माणके आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार (वय ४८, रा. चिवेली मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा चिपळूण रेल्वे स्थानकासमोरील साई मंदिराजवळ पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीत गांजासदृश अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५३० ग्रॅम वजनाचा, अंदाजे ३० हजार रुपये किमतीचा गांजासदृश पदार्थ जप्त केला. तसेच तो ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी देखील जप्त करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













