भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहर पोलिसांच्या वतीने ‘Digital Unity Safe Future’ या संकल्पनेवर आधारित एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे ते भाट्ये बीच या मार्गावर ही दौड उत्साहात पार पडली.
प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायबर सुरक्षेचा संदेश देणारे बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले. तसेच विविध घोषणा देत नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली.
या एकता दौडमध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, पोलीस मुख्यालयातील आरसीपी जवान तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतानाच नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहावे, सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













