Breaking News
मंडणगड : ट्रकमधून पडून क्लिनरचा मृत्यू, पन्हळीखुर्द येथे अपघात, चालत्या ट्रकचा क्लिनर साईडचा दरवाजा उघडल्याने क्लिनर रस्त्यावर कोसळला रत्नागिरी : महानगर गॅसच्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला सायबर भामट्यांचा 5.56 लाखांचा गंडा, व्हॉट्सॲपवर पाठवली बनावट APK फाईल, गॅस बिल ॲक्टिव्हेट करण्यासाठी 10 रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितलं चिपळूण : मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर हल्ला, शिंगावर उचलून रस्त्यावर आपटल्याने, गंभीर जखमी, मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी रिक्षा संघटना आक्रमक दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती

लांजा : वेरळ घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत

banner 468x60

लांजा तालुक्यातील वेरळ घाटात मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली. सततच्या पावसामुळे घाटातील माती खचून मोठी दरड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.


यापूर्वीही गेल्या आठवड्यात याच घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू असून, जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरड पूर्णपणे हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सततच्या पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *