Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण : तिवरे धरणातील डोहात बुडून बालकाचा मृत्यू

banner 468x60

फुटलेल्या तिवरे धरण विमोचकाजवळील डोहात कपडे धुण्यासाठी बहिणीबरोबर गेलेला अकरा वर्षीय बालक पाय घसरून बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

banner 728x90

रात्री उशिरापर्यंत स्थानिकांच्या मदतीने पोलिसांकडून शोधकार्य सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह डोहात सापडला. वंश संतोष खरात (१०, तिवरे धनगरवाडी) असे बुडालेल्या बालकाचे नाव आहे.

२ जुलै २०१९ रोजी तिवरे धरण फुटले. त्यानंतर या धरणाच्या विमोचकाजवळ डोह निर्माण झाला आहे. साधारण वीस ते पंचवीस फूट तो खोल असून सध्या त्यामध्ये गाळही साठला आहे.

त्याठिकाणी जनावरांना पाण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी ये-जा सुरू असते. मंगळवारी वंशची बहीण कपडे धुण्यासाठी या डोहाजवळ गेली होती. वंशही तिच्यासोबत गेला. या डोहापासून काही अंतरावर वंशचे वडीलही काम करत होते.

यावेळी वंश पाय घसरून पाण्यात पडला आणि गायब झाला. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर शोध घेण्यात आला. अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकातही माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र त्यामध्ये यश येत नव्हते.

अखेर रात्री पंप लावून डोहातील पाणी काढणे सुरू करण्यात आले होते. मात्र यश आले नाही. बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु झाली. त्यावेळी वंशचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


जिल्हा परिषद शाळा फणसवाडी येथे शिकणारा वंश पाचवी पास होऊन सहावीत गेला होता. त्याच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *