Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : सोमवारी देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद

banner 468x60

मागील काही दिवसांपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरु असल्याने पाणी टंचाई दूर झाली आहे. नगर पालिकेकडूनही पाणी पुरवठा नियमित सुरु झाला असून सोमवार 1 जुलै रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावे असे आवाहन नगर पालिकेने केले आहे.

पाणी टंचाईमुळे मे महिन्यात एक दिवस आड पाणी पुरवठा शहरात करण्यात येत होता. मात्र जून महिन्यामध्ये जोरदार पडलेल्या पावसामुळे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. मोठा पाऊस पडत असल्याने काही प्रमाणात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.

याबाबत नागरिकांकडून तक्रारीही होत आहेत. त्यामुळे शीळ जॅकवेल आणि साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी सोमवार 1 जुलै रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगर पालिकेने घेतला आहे. त्यामुळे सोमवारी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *