चिपळूण : उड्डाणपुलाच्या पिलरवरून पडून 4 कामगार जखमी

banner 468x60

चिपळूण उड्डाणपुलाचं काम सुरू असताना उड्डाणपुलाच्या पिलरवरून पडून 4 कामगार जखमी झाले आहेत.


गेल्या नऊ महिन्यांपूर्वी पुलाच्या गर्डरसह क्रेन कोसळण्याची घटना घडली असतानाच शुक्रवारी संध्याकाळी चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या पिलरवरून चार कामगार जमिनीवर कोसळल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या जखमींना दवाखान्यात उपचारासाठी नेलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीककरणाचे काम सुरू आहे.

यामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे- परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.

साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून दरम्यान बहादूरशेखनाका येथे १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाच्या गर्डरसह क्रेन कोसळण्याची घटना घडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *