Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : DBJ कॉलेजची भिंत कोसळून सुशांत घाणेकर या विद्यार्थांचा मृत्यू

banner 468x60

चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे धक्कादायक दुर्घटना घडली आहे. चिपळूणमधील DBJ कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

कोसळलेल्या भिंतीखाली दबून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान भिंत कोसळल्यानंतर शोधाशोध सुरु असताना एक विद्यार्थी बेपत्ता असल्याचं समोर आलं मात्र नंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळला आहे.

मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील व सध्या लोटे येथे राहून डीबीजे कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेणारा सिद्धांत प्रदीप घाणेकर, वय १९ हा काल दुपारपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला जात होता. त्याच्या मोबाईलचे लोकेशन कॉलेजच्या या संरक्षक भिंतीच्या येथे दाखवले गेले.

अखेर आज शनिवारी ही कोसळलेली संरक्षक भिंत बाजूला करण्यात आली. याखाली सिद्धांत घाणेकर याचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे कॉलेज प्रशासनाने कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थीनी नाराजी व्यक्त करीत या अपघाताची चौकशी झाली पाहिजे व संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करू लागले आहेत.

निष्काळजी पणामुळे एका निष्पाप विद्यार्थ्यांचा मात्र नाहक जीव गेला असल्याने प्रशासनाने याची वेळी चौकशी करावी अशी बोलले जात आहे.

डीबीजे कॉलेज येथे कोसळलेल्या संरक्षक भिंतीखाली सापडला विद्यार्थ्यांचा मृतदेह-शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *