Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : वाहन मालकाची साडेपाच लाखांची फसवणूक

banner 468x60

चिपळूण : विकलेल्या गाडीची रक्कम वाहन मालकाला न देता व कर्ज खात्यात न भरता एका व्यक्तीने ५ लाख ६० हजारांची आर्थिक फसवणूक केली.

चिपळूण पोलिस ठाण्यात केतन दत्तात्रय कांबळे (रा. काविळतळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ते १५ मार्च दरम्यान शहरातील काविळतळी येथील मॅक्स शाईन शोरूम येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुयोग राजाराम कदम (खडपोली, ता. चिपळूण) यांच्या मालकीची मोटार (एमएच ०८- एएक्स-१०६१) केतन कांबळे याने ६ लाख ५० हजार रुपयांना विकली.

त्यातील ९० हजार रुपये त्याने कदम यांना ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले व उर्वरित रक्कम ६० हजार रुपये रोख देणे आणि ५ लाख रुपये वाहन खरेदी करताना काढण्यात आलेल्या वाहन कर्ज बँक खात्यात जमा करण्याचे ठरले होते.

मात्र ते पैसे केतन कांबळे यांनी कदम यांना दिले नाहीत. तसेच कर्ज खात्यातही जमा न करता ५ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

तसेच त्यांची गाडीही परत केली नाही. या प्रकरणी फिर्यादी सुयोग कदम यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
X

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *