Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

कोकणात 1 जूनपासून मासेमारीवर बंदी, उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

banner 468x60

राज्य शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून समुद्रात मासेमारी करता येणार नाही.हा बंदी कालावधी ३१ जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे.

या काळात आदेशाचे उल्लंघन केले गेले तर त्या मच्छीमारांवर कडक कारवाई केली जाईल,असे मत्स्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन लवकर होत असल्यामुळे या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १५ एप्रिल ते १४ जून तसेच पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी करण्यात आली आहे.

या आदेशानुसार, परवानाधारक बिगर- यंत्रचालित नौकांना मासेमारीसाठी मुभा दिली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते तसेच या

कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. ही बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार आहे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक आहे;

तसेच ३१ जुलैपूर्वी समुद्रात मासेमारीसाठी कोणालाही जाता येणार नाही, असे मत्स्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. बंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी करू नये, अशी सूचना जिल्ह्यातील ८५ मच्छीमार सहकारी संस्थांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *