दापोली : फोनवर बोलता बोलता तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

banner 468x60

फोनवर बोलण्याच्या नादात विहिरीत पडून उत्तरप्रदेशमधील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 18 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जालगाव दापोली येथे घडली.

मोबाइलवर बोलण्याच्या नादात विहिरीत पडून उत्तर प्रदेशमधील तरुणाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री दापोली तालुक्यातील जालगाव येथे घडली.

राकेश भारद्वाज (३८ मूळ रा. गोंडा उत्तर प्रदेश, सध्या रा. जालगाव, दापोली) असे त्यांचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री ते रहात असलेल्या घराबाहेर फोनवर बोलत होते. तेव्हा त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्राने त्याला जेवायला बोलावण्यासाठी फोन केला. मात्र, बराचवेळ झाला तरी राकेश यांचा फोन लागत नव्हता.

त्यांचा फोन न लागल्याने मित्र घराबाहेर आला. मात्र, त्यांना ते कोठेच दिसले नाहीत.


त्यानंतर त्यांचा घराबाहेरच्या आवारात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता ते विहिरीत पडल्याचे दिसले.

त्यानंतर खबर देणार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विहिरीबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे त्याला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *