Breaking News
गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी खेड : व्यवस्थापन क्षेत्रात करिअरची संधी MBA / MMS प्रवेशासाठी ATMA 2026 द्वारे सुवर्णसंधी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण रत्नागिरी : उन्हाच्या तडाख्यात सरकारचा दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्येच मिळणार तीन महिन्यांचे रेशन, एप्रिल, मे, जूनचे धान्य एकत्र वाटप रत्नागिरी : नोटेच्या बदल्यात लाखांचे स्वप्न, 15 लाखांचे आमिष, 9 लाखांचा गंडा “जुन्या 5 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात 15 लाख रुपये मिळवून देतो”

खेड : शिमग्याला गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या कारचे टायर फुटून भीषण अपघात

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर मुंबईहून गुहागरला शिमगोत्सवासाठी येत असताना वॅगनआर गाडीचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात चालकासह ४ जण जखमी झाले.

गुरुवारी (२१) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई येथील एक कुटुंब शिमगोत्सवासाठी कारने (एमएच ४७ एबी ९५०३) गुहागरकडे जात होते. चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड आल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर धडकली.

हे लक्षात येताच चालकाने ती पुन्हा रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडीचे टायर फुटले आणि गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक, तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नागरिकांनी लगेचच धाव घेऊन जखमींना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढले.

त्याचवेळी खेडकडे येण्यासाठी निघालेले रुग्णवाहिका चालक आनंद घोले यांनी गंभीर जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *