Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : चोरी प्रकरणी दोन महिलांना अटक

banner 468x60

बांधकाम व्यवसायासाठी लागणारे 9 हजाराचे लोखंडी
साहित्य चोरीस गेल्याची घटना 2 ते 4 मार्च या कालावधीत उक्ताड परिसरात नासीर खोत यांच्या बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्यालयाशेजारी घडली होती.

पोलिसाच्या तपासाअंती दोन महिलांना याप्रकरणी अटक करण्यात असून सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विमल अरुण जुवे (30, उक्ताड), वर्षा विनोद गोसावी (30, खंड) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. नासीर खोत यांच्या बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्यालयाशेजारी हा चोरी पकार घडल्यानंतर यामध्ये 6 हजार किंमतीच्या लोखंडी सळ्या, 3 हजार रूपये किंमतीच्या लोखंडी चौकोनी रिंग असे 9 हजार रूपये किंमताया लोखंडी साहित्याचा समावेश होता.

या चोरी प्रकरणी जावेद अब्दुल गणी पोशरकर यांनी चिपळूण पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसाकडून या चोरीचा तपास सुरु असताना विमल जुवे, वर्षा गोसावी यांनी ही चोरी केल्याचे पुढे येताच पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. सोमवारी त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *