Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

खेड : विंचवाच्या दंशाने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, डॉक्टर नसल्याने जीव गेला, रुग्णालयासाठी दोन कोटीची इमारत , पन्नास लाखाचा डॉक्टरांचं निवासस्थान मात्र सेवा नाही

banner 468x60

खेड तालुक्यातील तळे ग्रामपंचायतचे कर्मचारी मंगेश शिर्के यांचा मोठा मुलगा सोहम मंगेश शिर्के (वय १५) याचा विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. नुकताच इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेला हा होतकरू विद्यार्थी अकाली मृत्यू झाला.

त्याच्या अंत्यविधीची शुक्रवारी (१३ जून) तळे कासारवाडी येथे दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात पार पडली. सोहमच्या निधनामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या अवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

तळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पंचक्रोशीतील सुमारे १५ गावांची आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी आहे. रुग्णालयासाठी दोन कोटी रुपये खर्चून उभारलेली इमारत व पन्नास लाख रुपये खर्चून डॉक्टरांसाठी बांधलेले निवासस्थान असूनही येथे अद्यापही पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. ग्रामस्थांच्या मते, कोणीही डॉक्टर त्या निवासस्थानात राहत नाही, हे अत्यंत गंभीर बाब आहे. सध्या या आरोग्य केंद्रात ओपीडी सेवा केवळ दुपारी १ वाजेपर्यंतच मर्यादित आहे.

त्यानंतर डॉक्टर हे अन्य ठिकाणी निघून जातात. शेतीच्या हंगामात सर्पदंश व विंचूदंशाच्या घटना वारंवार घडत असतात, मात्र एमबीबीएस डॉक्टर नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे सोहमसारखा निष्पाप जीव गमवावा लागला, हे अत्यंत दुःखद आहे.


सोहमच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात उपस्थित केला जात असून, संबंधित आरोग्य विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेने याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी तातडीने गंभीर दाखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्यावेळी अनुपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती खेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी दिली आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशीत घरच्यांनी त्याला कळंबणी रुग्णालयात न नेता खेड येथील खाजगी रुग्णालय नेले व पुन्हा कळंबणी रुग्णालय नेले.

त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला डेरवण येथे नेण्यात आले यामध्ये खूप वेळ गेला अशीही माहिती डॉक्टर खरटमोल म्हणाले. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. तसेच आरोग्य विभागाकडूनही याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *