Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : सात्विनगाव जोशीवाडीत दुर्दैवी अपघात; छताचा पत्रा तुटून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील सात्विनगाव जोशीवाडी येथे घराच्या छतावरील कचरा साफ करत असताना पत्रा तुटून खाली पडल्याने एका ७६ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाळू धोंडू नवरत असे मृत व्यक्तीचे नाव आहे.


banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, बाळू नवरत हे १९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आपल्या घराच्या छतावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी चढले होते. कचरा साफ करत असताना अचानक छताचा पत्रा तुटला आणि ते सुमारे सात फूट उंचीवरून थेट जमिनीवर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कानातून रक्तस्राव सुरू झाला.

घटनेनंतर त्यांना तात्काळ बेशुद्धावस्थेत लोटे-लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी त्याच दिवशी दुपारी मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी मृताचे नातू सागर संजय नवरत यांनी दिलेल्या माहितीवरून खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (A.D.) क्र. ३०/२०२६ नोंदविण्यात आला असून बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *