Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

खेड : लोटे एमआयडीसीतील ‘ॲक्वा फुड्स’ कंपनीत चोरी

banner 468x60

खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये चोरी उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी कंपनीतील महागड्या मशिनरींचे सुटे भाग चोरून नेल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. लोटे

परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘मे. ॲक्वा फुड एक्झीम’ या कंपनीत ही चोरी घडली. फिर्यादी धिरजलाल मंटूलाल बरुई (सध्या रा. चिपळूण, मूळ रा. कोलकाता) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२६ या कालावधीत कंपनी बंद असताना घडल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी कंपनीच्या परिसरात प्रवेश करून अत्यंत महागड्या आणि तांत्रिक मशिनरींचे भाग कापून लंपास केले.

ही मशिनरी डेन्मार्क येथील डॅनटेक फ्रिजींग सिस्टीम कंपनीकडून आयात करण्यात आली होती. चोरट्यांनी कुकिंग, कुलिंग आणि अल्ट्राफ्लो फ्रीजिंग लाईनमधील विविध कन्वेअर्स, इन्स्पेक्शन इन फीड कन्वेअर, हार्डनिंग टेम्परेचर इक्वलायझिंग कन्वेअर तसेच ट्रान्सफर कर्व्हड कन्वेअर यांसारखे महत्त्वाचे भाग कापून नेले.


याशिवाय, कुकरसाठी वापरला जाणारा सुमारे १५ लाख रुपये मूळ किंमतीचा प्रेशर व्हॉल्व्ह आणि ग्राइंडिंग मशिन्सचे कन्वेअर्सही चोरट्यांनी चोरून नेले आहेत. चोरीला गेलेल्या साहित्याची एकूण अंदाजे किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित मशिनरी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा चिपळूण येथे तारण ठेवण्यात आली होती.

त्यामुळे या चोरीमुळे आर्थिक नुकसानाबरोबरच बँक आणि कंपनीसाठीही गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.


घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. औद्योगिक वसाहतीसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात मशिनरी कापून नेण्याची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


सध्या पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *