Breaking News
रत्नागिरी : पत्रकारांना धमकी प्रकरण : खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी, मराठी पत्रकार परिषदेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, मुजोर आणि गावगुंडाप्रमाणे शिवीगाळ करणाऱ्या खासदाराचा कोकण कट्टा न्यूजकडूनही निषेध दाभोळमध्ये ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण, गरजू रुग्णांसाठी ठरणार आधारवड चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी गुहागर युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा, कार्यकर्ता म्हणून राहणार सक्रिय चिपळूण : डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या आमिषाने चिपळूणच्या व्यावसायिकाची ₹10.20 लाखांची ऑनलाइन फसवणूक

खेड : सरकारी वकील लाचलुचपतच्या जाळ्यात, निकाल संबंधित व्यक्तीच्या बाजूने लावण्यासाठी तब्बल 5 लाख घेतले

banner 468x60

रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत खेड येथे काम करणाऱ्या सरकारी वकिलास चिपळूण येथे लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

banner 728x90

संबंधित सरकारी वकिलाने एका प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी तब्बल 5,00,000/- रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये 1,50,000/- रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव आणि पर्यवेक्षण अधिकारी अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सध्या अधिक तपास सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करत आहे.संबंधित घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सरकारी यंत्रणेत पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *