चिपळूण : पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार निसार शेख यांना वृत्तपत्र विद्या पदविका, परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

banner 468x60

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (अकॅडमी), नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र विद्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेत शिरगाव येथील निर्भीड पत्रकार निसार महंमद शेख यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.

banner 728x90

मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन पत्रकारिता क्षेत्रातील आपले ज्ञान, कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती सिद्ध केली. त्यांच्या या यशाबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (अकॅडमी), नाशिक यांच्या वतीने त्यांना वृत्तपत्र विद्या पदविका प्रदान करण्यात आली.

गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले निसार महंमद शेख हे दैनिक सागर तसेच नवराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या विविध प्रश्नांवर निर्भीडपणे लेखणी चालविणारे पत्रकार म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल पत्रकारिता, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संस्थेच्या अध्यक्षा. कृत्तिका संदीप मराठे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून भविष्यातही पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. निसार शेख यांच्या या यशामुळे शिरगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *