संगमेश्वर : वस्तीगृहातील तीन मुलींसोबत अश्लील वर्तन, मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकाच्या मुलावर गुन्हा दाखल

banner 468x60

राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत.

अशातच संगमेश्वर तालुक्यातील कमलजाबाई पांडुरंग मुळये हायस्कूल व जुनिअर कॉलेज, कोळंबे यांच्या अनधिकृत वस्तीगृहात राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर संस्थेच्या अध्यक्षांनीच अत्याचार केल्याचे पुढे आले आहे.

संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संस्था अध्यक्ष नयन मुळये (वय ६७) त्यांचा मुलग प्रथमेश मुळये (वय ३६) शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६७ वर्षीय संस्था चालकावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शाळेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथे कमलजाबाई पांडुरंग मुळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अंतर्गत मुलांचे वसतिगृह मंजूर आहे तर संस्थेमार्फत मुलींचे वसतिगृह अनधिकृतपणे चालवले जाते.

गणेश उत्सवा दरम्यान शाळेला सुट्टी असल्याने वसतिगृहात राहणाऱ्या एकूण 23 मुलींपैकी 20 मुली गणेशोत्सवासाठी आपल्या गावी गेल्या होत्या. तर यातील तीन मुली सुरुवातीचे काही दिवस तक्रारदार यांच्या घरी राहायला आल्या होत्या.

मात्र तक्रारदार या कामानिमित्त पुणे येथे जाणार असल्याने तिन्ही मुलींनी संस्थाचालक नयन मुळये त्यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गणेशोत्सव संपेपर्यंत त्या मुली त्यांच्याकडेच राहत होत्या. या कालावधीत नयन मुळे यांच्या राहत्या घरी मुलींचा विनयभंग करण्यात आला.

ही गोष्ट सुट्टी संपल्यानंतर मुलींनी आपल्याला सांगितली. त्यानुसार आपण तक्रार दाखल करत असल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी बाललैंगिक

अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत संस्था अध्यक्ष नयन मुळये (वय ६७) त्यांचा मुलग प्रथमेश मुळये (वय ३६) शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित घटना गणेशोत्सवाच्या काळात घडली असून तीन पैकी एक मुलगी महाविद्यालयात व अन्य दोन मुली शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत.

पोलिसांनी तिन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. घटनेची सत्यता पडताळणी करून उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या गुन्ह्याचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *