रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील कोंबडी गल्ली परिसरात कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली.
ही कारवाई ३० जून २०२६ रोजी दुपारी ३.५७ वाजण्याच्या सुमारास शृंगारतळी बाजारपेठेतील एका बंद टपरीच्या मागील आडोशाला करण्यात आली. या प्रकरणी निलेश दिनकर जाधव (वय २८, रा. शृंगारतळी बाजारपेठ, ता. गुहागर) याला गैरकायदेशीरपणे बिगर परवाना कल्याण मटका जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश राजेंद्र सावंत (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.
गुहागर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ५६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०४ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एकूण १,०७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये १,०७० रुपये रोख रक्कम आणि ५ रुपये किंमतीचे निळ्या शाईचे वापरलेले बॉलपेन यांचा समावेश आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













