गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद जानवळकर यांच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी मनापासून कौतुक केले.
विनोद जानवळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून जानवळे गावातील तिन्ही जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असून, शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. याशिवाय गावातील गरीब व गरजू नागरिकांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वेळोवेळी मदतीचा हातही ते देत असतात.
या कार्यक्रमाला जानवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वैभवी जानवळकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, शाळा क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका स्वरुपा घोरपडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कोंडविलकर, शिक्षणतज्ज्ञ श्रीराम देवस्थळी, आदर्श शिक्षक चंद्रकांत बेलेकर, सचिन कांबळे, दर्शना समगिस्कर, सोनाली भादेकर, इंदिरा मदने, शाळा क्रमांक २ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रिती जांभळे, शिक्षक देशमुख, शिक्षणतज्ज्ञ रविंद्र इंदुलकर तसेच शाळा क्रमांक ३ चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदीप तुप्ते, शिक्षिका ममता विचारे, धनश्री जाधव आणि विजया शिंदे उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष स्वप्निल जाधव, शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार, जानवळे शाखाध्यक्ष सुशांत कोंळबेकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोंडविलकर, निलेश गमरे आणि विवेक जानवळकर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी तिन्ही शाळांच्या वतीने विनोद जानवळकर, उपसरपंच वैभवी जानवळकर आणि उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून असेच सहकार्य कायम ठेवावे, अशी अपेक्षा शाळांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













