दाभोळ : वणौशी तर्फे पंचनदीत ‘महाविस्तार AI’ अ‍ॅपचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांचा डिजिटल शेतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

banner 468x60

प्रतिनिधी : सागर गोवळे, रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी सखी’ गटाच्या वतीने दापोली तालुक्यातील वणोशी तर्फ पंचनदी येथे ‘महाविस्तार AI’ अ‍ॅपचे यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमादरम्यान कृषी सखी गटातील विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे कृषीविषयक माहिती सहज कशी मिळवता येईल, याचे मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या स्मार्टफोनमध्ये महाविस्तार AI अ‍ॅप डाउनलोड करून ते सक्रिय करण्याची संपूर्ण प्रक्रिया कु. पायल मोरे यांनी प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगितली.

या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक सल्ला, स्थानिक हवामानाचा अंदाज, पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, बाजारभाव तसेच विविध कृषी सेवांची माहिती घरबसल्या उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी कु. संजना सदानंद जंगले यांनी अ‍ॅपचे फायदे आणि आधुनिक शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *